इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवतारे यांना आवरले नाही, तर राज्यभरात शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेऊन जागा पाडू, असा इशारा अजित पवार गटाने दिल्यामुळे महायुतीत खळबळ निर्माण झाली आहे. कल्याणपाठोपाठ मावळ लोकसभा मतदारसंघात हा इशारा दिल्यामुळे वरीष्ठ नेत्यांनी याची दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवतारे यांना समजावून सांगितल्यानंतर ते शांत बसतील अशी अपेक्षा होती. पण, त्यांची विरोधी भूमिका सुरुच आहे. त्यामुळे आम्हीही ‘अरे’ ला ‘का रे’ उत्तर देऊ शकतो. पण आम्हाला युतीचे वातावरण खराब करायचे नाही,’ अशी अजित पवार यांनी सांगितले. पण, त्यानंतरही या प्रकराचे पडसाद उमटत आहे.
कल्याण पाठोपाठ आता मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत बारणे यांचे काम न करण्याचा इशारा दिला आहे. मुंबईला जाण्यासाठी मावळमधूनच जावे लागते, असा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते आनंद परांजपे यांनी, तर मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या नेत्यांवर वचक राहिला नसल्याचा आरोप अगोदर केला आहे.