मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वांद्रे येथील ताज लॅन्डस एंड हॅाटेलमध्ये महायुतीची बैठक सुरु असून या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थितीत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्दा असल्यामुळे मनसेच्या युतीची घोषणा आज होऊ शकते.
काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांची एक गुप्त बैठक झाली. त्यानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीत सहभागी होण्याविषयी चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत राज ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यात्यातील नेत्यांची ही बैठक असून त्यात जागा वाटपाचा निर्णय़ होऊ शकतो. मनसे दोन जागेसाठी आग्रही असून एक जागा दक्षिण मुंबईची देण्याचे निश्चित आहे. पण, दुसरी जागा शिर्डी की नाशिक हे या बैठकीत ठरु शकते…