नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुंडा विरोधी पथकाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस १ देशी कट्टा व ३ जिवंत काडतुस सह जेरबंद करून केली आहे. या कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १० नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्यीत गौतम चिंतामण भगत याचे उपनगर येथील आम्रपाली झोपडपट्टीच्या घरी आरोपी रोशन काळे, मॉन्टी काळे, प्रदिप सोनवणे यांनी धारधार हत्यारे घेऊन गेले. येथे भाऊ तथागत यास काही एक न सांगता डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार केले. निलेश जाधवला का लपवता मी तुलाच संपवतो असे म्हणुन फिर्यादी यांचे डोक्यात वार करुन करुन पळून गेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या फरार आरोपींचा पोलिस शोध घेत होते. आरोपी रोशन काळे उर्फ बाले हा त्याचेकडे असलेल्या हत्यारासह निलगीरी बाग, म्हाडा वसाहत या भागात येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार निलगीरी बाग म्हाडा वसाहत परिसरात गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सपोनि /ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी सापळा रचुन गुन्हयातील पाहिजे आरोपी रोशन उर्फ बाले भागवत काळे वय-२४ रा. भिमनगर हौसिंग सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक यास शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले असता त्याचेकडे १ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ३ जिवंत काडतुसे असे एकुण ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.