इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांना भूकंपचा मोठा धक्का बसला आहे. पहिला धक्का सहा वाजून आठ मिनिटांनी बसल्यानंतर काही वेळातच झालेल्या ३.६ रिश्टर क्षमतेचा दुसरा धक्का बसला. या भूकंपामुळे नुकसान झाले असल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्याच्या सूचना गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
नांदेड शहरात सकाळी ६ वाजून ९ मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १५ किलोमीटरवर आहे.नांदेड शहरासह ग्रामीण भागातील आज पहाटे घरातील वस्तू हादरल्या.