इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीत बुधवारी काँग्रेसच्या सुकाणून समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रसच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. त्यात महाराष्ट्रातील १३ नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहे. या नावांमध्ये दोन बड्या नेत्यांची नावे सुध्दा आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून १८ जागा लढवणार आहे. त्यात पुणे येथे वसंत मोरे यांच्या नावाची चर्चा होती येथे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवर शिवसेनेने दावा करुन उमेदवारी घोषीत केली. पण, या ठिकाणी काँग्रेसने विशाल पाटील यांचे नाव पुढे केले आहे.
ही आहे काँग्रेसची संभाव्य नावे…
भंडारा – गोंदिया – नाना पटोले
चंद्रपूर – विजय वेडेट्टीवार
अमरावती – बळवंत वानखेडे
नागपूर – विकास ठाकरे
सोलापूर- प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू महाराज
पुणे – रविंद्र धंगेकर
भिवंडी – दयानंद चोरगे
नंदुरबार – गोवाल पाडवी (के.सी. पाडवी यांचा मुलगा)
गडचिरोली – नामदेव किरसान
नांदेड – वंसतराव चव्हाण
लातूर – डॅा. शिवाजी काळगे
सांगली – विशाल पाटील