मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ या परीक्षेतून गट-अ व गट-ब (राजपत्रित) पदाच्या एकूण २३ संवर्गांसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प (Opting Out) दिनांक २७ मार्च, २०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तद्नंतर शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.









