इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. जरांगे यांच्या बीडमध्ये होणाऱ्या बैठकीला परवानगी देण्याचे आदेश खंडपीठाने बीड पोलिसांना दिले आहे. बीड पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती; मात्र न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने काढलेल्या आदेशानुसार जातीय सभा संमेलन, बैठकांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा आधार घेत पोलिसांनी जरांगे यांच्या बैठकीला परवानगी नाकारली होती. याविरोधात बैठकीच्या आयोजकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर आजच सुनावणी होऊन न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीसाठी आयोजकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती; मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून पोलिसांनी परवानगी नाकारली होती.