इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : आजच्या काळात किरकोळ कारणांवरून देखील नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, त्यातून मग त्याचे दुष्परिणाम नाही दिसू लागतात. पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला तर ते विभक्त राहतात आणि भांडण विकोपाला जाऊन त्यातून विपरीत घटना घडतात. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार घडला. पती-पत्नी वेगवेगळे राहत असल्याने पत्नीने पतीला त्रास देण्यासाठी पती आणि सासऱ्याच्या घरावर अश्लील फोटो चिटकवले, घरी कोणी नसल्याचे बघून तिने हा डाव साधला. मात्र जेव्हा हा प्रकार सासऱ्याला कळला, तेव्हा मोठी खळबळ झाली. आता या प्रकराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. घराची पाहणी केल्यावर त्यांना हे फोटो दिसून आले.
मुलाने पतीला सांगितला हा गैरप्रकार
हिंगणघाट येथील संतकृपा नगरातील हा धक्कादायक प्रकार समोर आला. येथील रहीवासी शंकर खिरडकर यांच्या मुलाचे व सूनेचे पटत नाही म्हणून ते विभक्त राहतात. त्यातून हा प्रकार समोर आला. खिरडकर हे आपल्या पत्नीसह वरोरा येथे एका कार्यक्रमास घरास कुलूप लावून गेले त्यावेळेस संधी साधून सून रंजना हिने पती आणि सासऱ्याच्या घराच्या दारावर अश्लील फोटो चिकटवले.
त्यानंतर ती त्यावर थांबली नाही तर हे फोटो पतीच्या व्हॅाटसअॅप वर पाठविले. आता तीने कोणाची बदनामी करण्यासाठी हा गैरप्रकार केला हे अजून पुढे आले नाही. पण, या प्रकाराची पोलीसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे यातून नेमका काय उद्देश होता हे समोर येईल. पण, त्यातून सूड घेण्यासाठी काय प्रकार केले जाते हे नागपूरच्या एका घटनेने समोर आले. त्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा आहे.