इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ८५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या १२ डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
८५ वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना १२ डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.