नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील एका तरूणास तब्बल सव्वा २५ लाखास गंडा घातला. गुंतवणुकीवर अल्पावधीत जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल सतिश सोनवणे (रा.औटेमळा,जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांच्याशी भामट्यांनी विविध मोबाईल क्रमांकावरून गेल्या ऑगष्ट महिन्यात संपर्क साधला होता. यावेळी गुंतवणुकीवर अल्पवाधीत जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखविले. तसेच सिन्नी ट्रेडर हे मोबाईल अॅप्लीकेशन डाऊन लोड करण्यास भाग पाडून त्यात गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले. काही काळ सोनवणे यांनी गुंतवणुक केल्यानंतर त्यांचा एका लिंकच्या माध्यमातून व्हॉटसअप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला.
ग्रुपमधील सदस्यांबरोबर सोनवणे यांनी ९ लाख ९ हजाराची तर अॅप्लीकेशनच्या माध्यमातून काही अशी सुमारे २५ लाख ३१ हजार ६८७ रूपयांची गुंतवणुक केली मात्र अनेक महिने उलटूनही गुंतवणुकीसह परतावा मिळाला नाही.त्यामुळे सोनवणे यांनी संबधीतांशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. एकुणच फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
………