नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रबुध्द नगर भागात जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर एकाने बलात्कार केल्याचा प्रकार घडला. स्व:ताच्या घरात बोलावून घेत संशयिताने हे कृत्य केले असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिशरण नाना आगळे (रा.महिंद्रा कंपनी गेट समोर,प्रबुध्दनगर) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन शाळकरी पीडितेने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून, गेल्या २८ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शाळेतून घरी जाणा-या मुलीस संशयिताने आपल्या घरात बोलावून घेत हे कृत्य केले.
घरात कुणी नसतांना संशयिताने मुलीस जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. भेदरलेल्या मुलीने घटनेनंतर काही दिवसांनी या प्रकरणाची आपल्या कुटुंबियांकडे वाच्यता केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.