इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपला सत्ता राखता येईल का असा प्रश्न असतांना दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुद्दा रस्सीखेच आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन एकाने थेट माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहचे राजीनाम्याचे पत्र थेट व्हायरल केले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. नेमकं काय घडलं की जेष्ठ नेत्याने राज्यात चांगले वातावरण असतांना राजीनामा दिला. त्यामुळे सर्वजणांना आश्चर्य वाटले. पण, त्यानंतर ते पत्र बनावट असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या पत्राची कॅापी व्टीट करत दिग्विजय सिंहने लिहले की, भाजप @BJP4India खोटे बोलण्यात माहिर आहे. मी १९७१ मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व घेतले. मी काँग्रेसमध्ये पदासाठी नाही तर माझ्यावर विचारधारेचा प्रभाव असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहीन. या खोट्या विरोधात मी पोलिसात तक्रार दाखल करत आहे. @INCIndia @DGP_MP
मध्यप्रदेश काँग्रेसने सुध्दा या खोट्या पत्रा विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.