नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालूक्यात दुष्काळी परिस्थिती असतांना माणिकपुंज धरणातून पाण्याचा अवैधरित्या उपसा होत असल्याने महसूल, पोलिस, वीज वितरण नगरपालिका यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत धरणावर अवैधरित्या टाकण्यात आलेले १५ विज पंप जप्त केले.
धरण्यात सध्या अत्यल्प पाणी साठा असल्याने पाटबंधारे विभागाने धरणातून पाण्याचा उपसा करणा-या १७७ परवाना धारक व विनापरवाना धारक या सर्वांना आपले कृषीपंप हटविण्याचा इशारा दिला होता. मात्र त्याला न जुमानता विज पंप सुरुच असल्याने या पथकाने कारवाई केली आहे.