इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत मनसे नेते राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर महायुतीबाबत बैठक झाल्यानंतर त्यावर काय निर्णय़ झाला याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. या बैठकी बाबत अद्याप पर्यंत गुप्तता बाळण्यात आली असून त्याबाबत कोणीही अधिकृतपण काय ठरलं याबाबत वक्तव्य केली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीबाबत विचारले असता त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राज ठाकरे यांची अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असे वाटते आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. त्यांनी या बैठकीबाबत स्पष्टपणे बोलणेही टाळले.
या बैठकीत दोन जागाबाबत संमती झाल्याची चर्चा असून आता या दोन जागा कोणत्या यावर राज्यभर चर्चा सुरु झाल्या आहे. पण, त्याबाबत मनसे व भाजपकडून अजूनही अधिकृतपणे कोणी बोलले नाही. दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार दक्षिण मुंबईची जागा निश्चित आहे. पण, दुसरी जागा शिर्डी व नाशिकची यावर चर्चा सुरु आहे. शिर्डीमध्ये खा. सदाशिव लोखंडे व नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे दोन्ही शिंदे गटाचे खासदार आहे. या सर्व जागा शिंदे गटाकडे असल्यामुळे या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आज चर्चा होवू शकते. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलेल जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने सोमवारी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर मंगळवारी त्यांची भेट भाजप नेते विनोद तावडे यांनी हॅाटेलमध्ये पहिले घेतली. त्यानंतर हे दोघेही गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले. येथे अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. पण, दोन दिवस उलटूनही या मनसेच्या युतीत नेमकं काय झालं हे अधिकृतपणे कोणीही सांगितले नाही.