बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक….महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यात छेडझाड

by India Darpan
मार्च 19, 2024 | 11:52 pm
in संमिश्र वार्ता
0
gov e1709314682226

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगर महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश करुन मंजूर आराखड्यातील ना-विकास क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करुन व दस्तऐवजांचे बनावटीकरण करुन अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या गैरप्रकारामुळे शासनाची आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. याबाबत आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी नगररचना विभागाच्या संचालकांना कळविले आहे.

औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (AMRDA) कार्यालयामध्ये कार्यरत असणारे नगररचना विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपरोक्त बाबींना आळा बसावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्राप्त प्रकरणांची चौकशी करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे इत्यादी प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. स्वतःहून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने अथवा संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित केल्या जात नसल्याने मंजूर आराखड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुचित फेरबदल होत असल्याने विकास आराखड्याचा मूळ उद्देश साध्य होणार नाही, अशी आपली धारणा असल्याचेही विभागीय आयुक्त अर्दड यांनी संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महानगराबाबतीत अत्यंत महत्त्वाचा विषय हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम 1966 शी निगडीत असल्याने व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने तसेच वरील गैरप्रकारामुळे शासनाची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनास प्रतिकूल ठरत असल्याची शक्यता व्यक्त करून याबाबत आपल्या स्तरावरुन उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असेही श्री. अर्दड यांनी म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मित्रांचा वाद मिटवण्यात गेलेल्या २८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॅाक मारला…दहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post

राज्यातील या १२ मोठ्या अधिका-यांच्या बदल्या….

India Darpan

Next Post
Mantralay

राज्यातील या १२ मोठ्या अधिका-यांच्या बदल्या….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011