नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालच्या मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी हे एक हजार रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात सापडले आहे. लाच देण्यास नकार दिल्यामुळे हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव करणा-या मुख्याध्यापकाने नंतर लाच घेतली व एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे आदर्श हायस्कूल कुसुंबा येथे उपशिक्षक या पदावर आहेत. शाळेत झालेल्या विद्यार्थी संमेलनाचे निमित्त करून झालेल्या खर्चाच्या नावाने मुख्याध्यापक यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती. सदर खर्चाची तरतूद ही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फी सोबत स्वतंत्रपणे केली असल्याने तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार दिला असता तक्रारदार यांना आलोसे यांनी हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव केला होता. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचांसमक्ष लाचेची रक्कम 1,000/- रुपये मागणी करून आलोसे यांनी रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. धुळे
तक्रारदार- महिला, 55 वर्ष.
आरोपी – प्रदीप पुंडलिक परदेशी, वय-55 वर्ष, व्यवसाय:- नोकरी, (मुख्याध्यापक आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा ता जि धुळे)
*लाचेची मागणी- 1,000/- रुपये दिनांक 18/03/2024
*लाच स्वीकारली* 1,000 /- रुपये दिनांक 19/03/2024
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे आदर्श हायस्कूल कुसुंबा येथे उपशिक्षक या पदावर आहेत. शाळेत झालेल्या विद्यार्थी संमेलनाचे निमित्त करून झालेल्या खर्चाच्या नावाने आलोसे यांनी 1,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. सदर खर्चाची तरतूद ही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फी सोबत स्वतंत्रपणे केली असल्याने तक्रारदार यांनी लाच देण्यास नकार दिला असता तक्रारदार यांना आलोसे यांनी हजेरी रजिस्टरवर सही करण्यास मज्जाव केला होता. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता आलोसे यांनी पंचांसमक्ष लाचेची रक्कम 1,000/- रुपये मागणी करून आलोसे यांनी रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*पर्यवेक्षण अधिकारी – मा.श्री.अभिषेक पाटील,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा अधिकारी – हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सह सापळा अधिकारी 1) मनजीतसिंग चव्हाण 2) रूपाली खांडवी
पोलीस निरीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक*- पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, पो.ना. संतोष पावरा,
पो.शि.मकरंद पाटील, प्रशांत बागुल,रामदास बारेला, प्रविण पाटील,सुधीर मोरे,