नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषदेचे शिक्षक त्याचबरोबर विद्यार्थी यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने विनोबा ॲप हे तयार करण्यात आले या विनोबा ॲपच्या माध्यमातून शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेत त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांबद्दल माहिती देतात ज्या उपक्रमांना सर्वाधिक पसंती असते अशा उपक्रमाची निवड पोस्ट ऑफ द मंथ साठी केली जाते.
विनोबा ॲप मध्ये उत्कृष्ठ कामगिरी आणि पोस्ट करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येतो. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याचसोबत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे चांगल्या पद्धतीने आयोजन करणाऱ्या शिक्षकांना देखील गौरविण्यात आले. सर्व शिक्षकांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी कार्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी विनोबा ॲप संस्थेचे संजय दालमिया,शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, राजीवकुमार सिंग, विस्तार अधिकारी (शिक्षण) संतोष झोले आदि उपस्थित होते.
या शिक्षकांचा करण्यात आला गौरव-
पोस्ट ऑफ मंथ जानेवारी – माया सोनवणे, जि.प. शाळा भरवीर बुद्रुक, ता. इगतपुरी,
लालू गारे,जि.प. शाळा पिंपळगाव ता. इगतपुरी,
वैशाली खैरनार,जि.प. शाळा नीलगव्हाण ता. मालेगाव,
जयश्री येवला, जि.प. शाळा रावळगांव ता. मालेगाव,
सुरेखा ठाकरे, जि.प. शाळा पिंपळगाव ता. इगतपुरी,
पोस्ट ऑफ मंथ फेब्रुवारी –सुजाता बोरसे, जि.प. शाळा वाडीवऱ्हे ता. इगतपुरी, गायत्री आहेर,जि.प. शाळा नील गव्हाण ता. मालेगाव,
नलिनी सांगळे, जि.प. शाळा वाडेल ता. मालेगाव,
संजय कुमार सुसलादे जि.प. शाळा शिराळे ता. पेठ,
सोमनाथ ठोंबरे, जि.प. शाळा कृष्णवाडी ता. येवला