इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई उच्च न्यायालयाने एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ११ नोव्हेंबर २००६ ला अंधेरीतील सात बंगला येथे फेक चकमक घडवून आणली होती. या चकमकीत त्यांनी लखनभैयाची हत्या केली होती. यावेळी एन्काउंटरमध्ये हत्या झाल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी लखनभैयाचे वकील रामप्रसाद गुप्ता यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी सातत्याने कोर्टात युक्तिवाद केला.
या प्रकरणात मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणी २०१३ मध्ये ११ पोलीस आणि २१ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यावेळी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. या निकालाविरोधात वकील रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच इतर ११ आरोपींनी जन्मठेपेच्या शिक्षाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर या प्रकरणांची एकत्रित सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.