इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत असलेल्या वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयात आज चिन्हाच्या व नावाच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालायने केंद्रीय निवडणूक आयोगाला चिन्ह व पक्षाच्या नावाबाबत निर्देश दिले आहे. त्यात शरद पवार गटाला लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव व तुतारी चिन्ह वापरण्यास मुभा दिली आहे. तुतारी चिन्ह हे राखीव ठेवावे इतर कोणत्याही पक्षाला व उमेदवाराला ते देऊ नये असे निर्देश दिले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पूरते दिले होते. आता तेच चिन्ह व पक्षाचे नाव आता आगामी दोन्ही निवडणुकीसाठी कायम राहणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी नाव सारखेच दिल्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. आता तेच नाव कायम राहणार असल्यामुळे चिन्ह सोडले तर नावात फार फरक नाही.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी मान्यता दिली. त्या विरोधात शरद पवार गट न्यायालयात गेला असून त्याची सुनावणी अजून सुरु आहे.