पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- करिअरमध्ये परिवर्तन घडवून आणणारे आणि लोकांना स्वत:ला अपग्रेड करण्यास मदत करणारे भारताचे पहिले बिझनेस कोच सीए राहुल मालोदिया यांनी २२ मार्च २०२४ रोजी पुणे येथील बुनतारा भवन ऑडिटोरियममध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजता आपला पहिला वहिला ऑफलाइन ‘व्यापारी टू सीईओ’ कार्यक्रम आयोजित केला आहे. १००० हून अधिक ऑनलाइन वेबिनार्सचे यशस्वी आयोजन करणारे आणि गेल्या १० वर्षांमध्ये २००,००० हून अधिक व्यावसायिकांना प्रशिक्षण देणारे भारताचे आघाडीचे बिझनेस कोच सीए राहुल मालोदिया हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
एका दिवसाचा ‘व्यापारी टू सीईओ’ हा कार्यक्रम उद्योजक, स्वयंरोजगार असणाऱ्या व्यक्ती, उत्पादन, आपल्या मालकीचा व्यवसाय असलेल्या व्यक्ती, व्यावसायिक आणि आपले उद्योग आणि स्वयंचलित कार्यपद्धतींची व्याप्ती वाढविण्याची आकांक्षा असलेले व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त आहे. सहभागी व्यक्तींच्या व्यवसायात यशस्वी होण्याच्या शक्यता झपाट्याने वाढविण्यासाठीचे चार प्रमुख आराखडे अर्थात ब्लूप्रिंट्स राहुल मालोदिया या कार्यक्रमात सर्वांसमोर मांडणार आहेत: उद्योजकतेच्या स्वातंत्र्याची ब्लूप्रिंट, टीम उभारणीसाठीची ब्लूप्रिंट, विक्री वाढविण्यासाठीची ब्लूप्रिंट आणि वित्तव्यवस्थेवर हुकूमत मिळविण्याची ब्लूप्रिंट. या कार्यक्रमामध्ये एक खास प्रश्नोत्तरांचे सत्रही घेण्यात येणार आहे, ज्यात मालोदिया प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
मालोदिया बिझनेस कोचिंगचे संस्थापक राहुल मालोदिया म्हणाले, “भारतातील बहुतेक व्यवसाय मालक सीईओ प्रमाणे वागण्याऐवजी स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीप्रमाणे काम करतात, ज्यामुळे त्यांच्यातील वाढीच्या शक्यतेवर मर्यादा येतात. या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला तुमच्या व्यवसायात वेगवान वृद्धी करण्यासाठी कर्मचारी, वित्तपुरवठा, विक्री आणि विचारसरणी यांची वरची पायरी गाठून देणाऱ्या प्रयोगसिद्ध धोरणांविषयी सांगणार आहे. आम्ही पुण्यातील आणि भोवतीच्या परिसरातील उद्योजकांना आणि होतकरू व्यवसाय मालकांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देत आहोत.”
एक उच्च दर्जाची कामगिरी करणारी टीम कशी उभारावी इथपासून ते विक्री व वित्तीय व्यवस्थापनावर हुकूमत कशी मिळवावी इथपर्यंतचे विषय समजून घेण्याबरोबरच हा कार्यक्रम उपस्थित व्यक्तींना आपल्या व्यवसायात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक ब्लूप्रिंट्स आणि विचारसरणीही पुरविणार आहे.