नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर दुमाला येथे घरात घुसून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम दळवी (रा.कदम लॉन्स पाठीमागे जयभवानीरोड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत ३९ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता घरात एकटी असतांना परिचीत असलेल्या संशयिताने तिच्या घरात घुसून हे कृत्य केले. घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने महिलेस पकडून तुझ्याशी मैत्री करायची आहे असे म्हणत तिचा विनयभंग केला.
महिलेने विरोध केला असता संशयिताने याबाबत वाच्यता केल्यास तुझ्याकडे बघून घेईल असा दम दिला. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.