शनिवार, नोव्हेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला पत्र…ठाकरे-पवारांवर विश्वास उडाला, ७ जागांवर काँग्रेसला पाठिंबा देऊ

मार्च 19, 2024 | 3:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Prakash Ambedkar


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहले असून हे पत्र प्रचंड चर्चेत आहे. या पत्रात त्यांनी ठाकरे – पवारांवरील विश्वास उडाला असल्याचे सांगत काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देऊ असा प्रस्ताव दिला आहे. या पत्रात आमचा मुख्य अजेंडा हा भाजपला हरवणे हा असल्याचे म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहलेल्या पत्रात आंबेडकर यांनी म्हटले आहे की, १७ मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समपन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी असंख्य महाविकास आघाडी बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. महाविकास आघाडी मध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दलच्या असमान वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा हाच फॅसिस्ट, फुटीरतावादी, अलोकतांत्रिक भाजपा-आरएसएस सरकारचा आहे. या विचाराने मी महाराष्ट्रातील ७ जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की मला वंचित बहुजन आघाडी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेल्या कोट्यातून ७ मतदारसंघांची नावे द्या. तुमच्या पसंतीच्या या ७ जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्ण मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही आहे.

आता या पत्रावर काँग्रेस नेमकं काय उत्तर देते हे महत्त्वाचे आहे. दरम्यान या पत्रातून वंचितने महाविकास आघाडीतून आम्ही वेगळे होत असल्याचेही संकेत दिले आहे. त्यामुळे आता वंचित स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

I wrote a letter to Indian National Congress President Shri @kharge earlier today.

I have 𝐝𝐞𝐜𝐢𝐝𝐞𝐝 𝐭𝐨 𝐥𝐞𝐧𝐝 𝐕𝐁𝐀’𝐬 𝐟𝐮𝐥𝐥 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 @INCIndia 𝐨𝐧 7 𝐬𝐞𝐚𝐭𝐬 𝐢𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 , and requested Kharge ji to enlist me the names of 7… pic.twitter.com/OZwRt4nOKU

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 19, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज ठाकरे व गृहमंत्री अमित शहा यांच्या अर्ध्या तासाच्या भेटीत नेमकं ठरलं काय…

Next Post

घरात घुसून महिलेचा विनयभंग…गुन्हा दाखल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, ३० ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 29, 2025
Campus 1
इतर

सावधान… या जिल्ह्यात अवकाशातून उपकरणे पडण्याची शक्यता… प्रशासनाने दिली ही माहिती…

ऑक्टोबर 28, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी केली ही मोठी घोषणा…

ऑक्टोबर 28, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे ७ निर्णय…

ऑक्टोबर 28, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

घरात घुसून महिलेचा विनयभंग…गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011