इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने सोमवारी दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर आज त्यांची भेट भाजप नेते विनोद तावडे यांनी हॅाटेलमध्ये घेतली. त्यानंतर हे दोघेही गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले. येथे अर्धा तास बैठक झाली. आता महायुतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महायुतीत राज ठाकरे यांना दोन जागा मिळू शकतात. या दोन जागेवर मनसे स्वतच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या चिन्हावर लढवण्याची अट राज ठाकरे यांनी अमान्य केली असून त्यामुळे हा विषय़ आता संपला आहे. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर हे जवळपास मनसेचे उमेदवार निश्चित आहे. आता दुसरी जागा कोणती मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे. ती नाशिकची असू शकते असे बोलले जात आहे.
दिल्लीत गेल्यानंतर मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीनपैकी किमान दोन लोकसभा मिळाव्या असा आग्रह धरला आहे. या तीन पैकी दक्षिण मुंबईची एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकर यांच्यासाठी देण्याची भाजपने तयारी दर्शवली आहे. तर दुसरी कोणती जागा मनसेला मिळते हे बघणे आता औत्सुक्याचे असणार आहे. त्यात नाशिकच्या जागेवर मनसेचा जोर आहे.