इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमध्ये NDA ने जागा वाटप केले असून त्यात पशुपति पारस यांच्या पार्टीचे विद्यमान पाच खासदार सरकारमध्ये असतांना त्यांना एकही जागा न दिल्यामुळे ते नाराज झाले आहे. बिहारमध्ये भाजप १७, जेडीयू १६ व चिराग पासवान यांची एलजेपी ५ जागा लढवणार आहे. त्यांचे सीट शेअरिंगची घोषणाही झाली आहे. त्यात पशुपति पारस यांना एकही जागा देण्यात आलेली नाही.
रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर लोकजनशक्ती पार्टीमध्ये फुट पडली. त्यात रामविलास पासवान यांचे बंधु पशुपति पारस यांनी पार्टीचा ताबा मिळवला. त्यानंतर रामविलास यांचे पुत्र चिराग पासवान यांनी प्रचंड विरोध केला. पण, या संघर्षात पशुपति पारस यांना भाजपने साथ दिली. पण, आता या लोकसभेत भाजपने पशुपति पारसला धक्का देत चिराग पासवान यांना जवळ केले असून त्यामुळे पशुपति पारस हे नाराज झाले आहे.
या सर्व घडामोडीनंतर आरएलजेपी अध्यक्ष पशुपति पारस यांनी सांगितले की, काल, एनडीए आघाडीने बिहार लोकसभेसाठी ४० उमेदवारांची यादी जाहीर केली. आमच्या पक्षाचे पाच खासदार होते आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले. आमच्यावर आणि आमच्या पक्षावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.