नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद शिवारात होंडाई कंपनीची असेंट कारमध्ये २० लाख ३७ हजाराचा गांजा नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने जप्त केला. मखमलाबादमध्ये विनायक रो-बंगलो नावाचे रो हाउसेस समोरील रस्त्यावर, मानकर मळा येथे ज्ञानेश्वर बाळु शेलार, वय ३२ वर्षे, हल्ली रा. जयशंकर रो हाऊस नं. ०८, श्रीकृष्ण मंदीराजवळ, मानकर मळा, मखमलाबाद, नाशिक, मुळ रा. घर नं. १९३, वावरे लेन, शिवाजी रोड, शालीमार, भद्रकाली, नाशिक, निलेश अशोक बोरसे, वय २७ वर्षे, रा. रो हाऊस नं. १ बी १, मातोश्री निवास, पुष्कर व्हॅली अपार्टमेंट, औदुंबरनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी होंडाई कंपनीची असेंट मोडेल असलेली क्रमांक एमएच ०४ बी क्यु ०७७८ या गाडीच्या डिकीमध्ये तपासणी केली. त्यात हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असलेला कॅनाबिस (गांजा) २० लाख ३७ हजार ६०० रुपये किंमतीचा एकुण १०१ किलो ८८० ग्रॅम वजन असलेल्या अंमली पदार्थाची बेकायदेशिररीत्या कब्जात बाळगुन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना मिळून आला. या आरोपी यांचेविरूध्द एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २० (क) सह २९ प्रमाणे म्हसरूळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे, सपोआ भुसारे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि जयराम पायगुडे, सपोनि हेमंत नागरे, सपोनि तोडकर, पोउपनि लाड, श्रेणी पोउनि दिलीप सगळे, सपोउपनि रंजन बेंडाळे, यांच्यासह पोलिसांच्या विशेष पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर या पथकाने केली आहे.