इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना तडकाफडकी बदली करत दणका दिला आहे. या गृहसचिवांबरोबरच पश्चिम बंगालच्या पोलिस प्रमुखांना हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांनाही हटवण्याचे आदेश दिल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांच्या बैठकीनंतर हे निर्णय घेण्यात आले. या राज्यांच्या अधिकाऱ्यांवर संबंधित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दुहेरी कार्यभार होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेल्या निष्पक्षतेशी आणि कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा दलांच्या तैनातीमध्ये तडजोड केली जाण्याची शक्यता होती.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबईच्या आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले असताना राज्य सरकारने तसे न करता निवडणूक आयुक्तांचीच बदली केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने कडक पाऊल उचलले आहे.