इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार व विजय शिवतारे यांचा वाद शमण्याची चिन्ह नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, माझी लायकी काय आणि आवाका किती हे अजित पवारांना दाखवणारच. यावेळी ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे, मी नसलो तरी सुनेत्रा पवार निवडून येत नाहीत.
यावेळी ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी मला उद्देशून शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच असा इशारा दिला होता. आता अजित पवारांना माझा आवाका किती, मी किती लहान आहे, माझी लायकी काय हे सर्व दाखवून द्याचचे आहे.
यावेळी ते म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आपली भूमिका स्पष्ट केली. जनतेची बारामतीतील अराजकता थांबवण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी नसलो तरी पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मात्र युतीधर्म पाळण्याचा सल्ला दिला. त्यांचे काहीही होवो, आपण त्यामध्ये पडू नये, असे त्यांनी मला सांगितले असले, तरी गेल्या ४० वर्षांमध्ये अजित पवारांना विरोध करणारा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वच लोकांना माझ्या उमेदवारीची उत्सुकता आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.