मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वाढत्या डासांचा प्रादुर्भाव, पार्किंगसह अन्य नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक सुविधा समिती तर्फे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरीकांसह तृतीयपंथीय सहभागी झाले होते.
सरजार चौकातून निघालेल्या या मोर्चात अग्रभागी डासाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. आगळ्या-वेगळ्या पध्दतीने निघालेल्या या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महापालिकेवर मोर्चा पोहचल्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका प्रवेशव्दारावर डासाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.