इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मनसे असणार असल्याचे बोलले जात होते. आज त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे, सचिन मोरे, हर्षल देशपांडे यांच्यासह त्यांचे मित्र आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. आता त्या अंतिम टप्यात असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची व नाशिकची जागा मागितली जाणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते. त्यामुळे भाजप – मनसे युती होण्याची शक्यता आहे.