मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया आघाडीची मुंबईत जाहीर सभा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेत या सभेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांची पत काढत त्यांना पाच मिनीटेच भाषणांसाठी दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सांगितले काल माझा तमाम हिंदु बंधू भगिणींनो, काल तो शब्द रद्द झाला.
यावेळी त्यांनी विश्वास गमावलेला विरोधी पक्ष असल्याचा उल्लेख करत ते म्हणाले नीती आणि अजेंडा नाही. त्यांच्या भाषणात मोदीव्देष दिसत होता. फक्त व्यक्तीदोष दुसरं काही नव्हतं. २०१४ ला चौकीदार चोर म्हणालात लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. ते साधे पंतप्रधान पदाचा उमेदवार दाखवू शकले नाही अशी टीकाही त्यांनी केली. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद बघा….या लिंकवर