नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई – आग्रा महामार्गावर जुना कसारा घाट येथे ऑइल रस्त्यावर पडल्याने मोटरसायकल व कार स्लीप होऊन अपघात झाला. या रस्त्यावरुन जाणारी कार एका नाल्यात तर मोटरसायकलस्वार स्लिप होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच वाहतुक पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या या ऑइलवर माती टाकली. या त्यांच्या कामाचे वाहनधारकांनी कौतुक केले. नेहमी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अशा पध्दतीने ऑइल कसे पडले हे मात्र समजू शकले नाही. गाडीतून ते पडले की ते कोणी टाकले याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
मोटारसायकल स्लीप झाल्यानंतर दोन जण जखमी झाले. या दोघांना इगरपुरीच्या शासकीय दवाखान्यात पुढील उपचारासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल केले. या अपघाताच मच्छिंद्र मधुकर डोळस(३९) रा. खेड भैरव, इगतपुरी तर मिनाबाई मच्छिंद्र डोळस (३५) या दोघे जखमी झाले. त्यांच्या हात व पायाला मार लागला आहे.