नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीसीटीव्हीच्या आधारे बसस्थानकात धुमाकूळ घालणा-या चोरट्या महिलेस पोलीसांना गजाआड करण्यात आले आहे. सीबीएस बसस्थानकात रविवारी (दि.१७) तीन महिलांचे मंगळसूत्र चोरीस गेल्याने पोलीसांनी संशयित महिलेस हुडकून काढले असून, याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा शंकर भोसले (रा. हसनाबाद सिल्लोड) असे संशयित महिलेचे नाव आहे. याबाबत चंदा अनिल आहेर (रा.हेडगेवार चौक, सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चंदा आहेर या रविवारी कळवण बसमध्ये चढत असतांना त्यांच्यासह शितल न्याहारकर व उज्वला बस्ते या विवाहीतांच्या गळय़ातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले होते.
ही बाब निदर्शनास येताच सरकारवाडा पोलीसांना पाचरण करण्यात आले होते. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे संशयित महिलेच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.