इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १६ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धी पत्रक क्रमांक. ECI/PN/23/2024 नुसार लोकसभा-२०२४ ची सार्वत्रिक निवडणूक आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी आणि मतमोजमी ४ जून रोजी होणार असल्याचे उपरोल्लेखित पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक आयोग भारताच्या राज्यघटनेच्या 172(1) कलम सोबत कलम 324 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 ने प्रदान केलेल्या अधिकारानुसार अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी निवडणूक घ्यायची आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही विधानसभांचा कार्यकाळ २ जून २०२४ रोजी संपत आहे.
ही बाब विचारात घेता निवडणूक आयोगाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकात खालील प्रसिद्धी पत्रकानुसार बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुक्रमांक. निवडणूक कार्यक्रम सध्याचे वेळापत्रक सुधारित वेळापत्रक
1 मतमोजणीची तारीख 4 जून, 202 (मंगळवार) – 2 जून 2024 (रविवार)
2 निवडणूक ज्यापूर्वी पूर्ण होणार आहे ती तारीख 6 जून, 2024 (गुरुवार) – 2 जून, 2024 (रविवार)
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.