मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत येथे शिवतीर्थावर झालेल्या भव्य सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. चव्हाण यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, तरीही त्यांनी माझ्यावर काही भाष्य करायचे असेल तर ते निराधार आहे… मी सोनिया गांधींना दिल्लीत भेटलो हे देखील खोटे आहे. हे वक्तव्य वस्तुतः चुकीचे आहे. हा सगळा राजकीय स्टंट आहे.
काय म्हणाल होते राहुल गांधी
काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते माझ्या आईला फोन करून रडत सांगत होते, सोनियाजी माझ्यात त्यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला जेलमध्ये जायचे नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून भाजपवर टीका केली होती.
अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. राहुल यांनी हा धागा पकडून ‘इंडिया’ आघाडीच्या सभेत चव्हाण यांचे नाव न घेता हल्लाबोल केला होता. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत या राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे.