मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत ही आहे भारतीय जुगार पार्टी असे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे.
या पोस्टमध्ये राऊत यांनी लिहले आहे, २८ फेब्रुवारी रोजी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळाची माहिती दिली. या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर अनेक तरुण मुले उध्वस्त होत असून या जुगारात अनेक कुटूंब नष्ट झाली. पोलिस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्याने या जुगारास सरकारी पाठबळ आहे. कारवाईची मागणी केली. फडणवीस कारवाई करतील कशी? या जुगारी कंपनीने (future gaming.. Martin lottery agency Ltd.) ४५० कोटी भाजपला देणगी दिली आहे. तर ही आहे भारतीय जुगारी पार्टी?
राऊत यांच्या पोस्टवर नेटक-यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यात त्यांनी, देणगी घेणारा स्टॅलिन काल सभेत उध्दव ठाकरे यांच्या बाजूला बसला होतो त्याचे काय यासारखे अनेक प्रश्न केले आहे.