इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पवार कुटुंबिय विभागाले आहे. त्यात अजित पवार एकटे पडल्याचे दिसत आहे. आता अजित पवार यांचे
सख्खे लहान बंधु श्रीनिवास पवार यांनी देखील त्यांची साथ सोडली आहे. याअगोदर त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उडी घेतली आहे. आता श्रीनिवास पवार देखील प्रचारासाठी बारामतीत दाखल झाले आहे. त्यांच्या एका छोटेखानी भाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
या क्लीपमध्ये ते म्हणातात, आमची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा आमदारकीला तू आहे, खासदारकीला साहेबांना राहू दे असे स्पष्ट आपण अजित पवार यांना सांगितले होते. साहेबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. काटेवाडीतील गावकरी म्हणून तुम्हाला हे सर्व माहित आहे. त्यांचे वय ८३ झाले म्हणून त्यांची साथ सोडणे मला पटले नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. आपणास दुस-या माणसांकडून लाभ मिळणार आहे. यामुळे सोडणे चुकीचे आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. ज्यांना पदे मिळाली ती साहेबांमुळेच मिळाली. आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा, हे माझ्या मनाता पटत नाही, औषधांची एक्सप्रायरी डेट असते. काही नात्यांची एक्सप्रायरी डेट असते, कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जावे मला पटल नाही, असेही ते म्हणाले.
याअगोदर आमदार रोहित पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार आणि सुनंदा पवार यांनी सुरुवातीलाच शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळ अजित पवार हे कुटुंबात एकटे पडल्याचे चित्र सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे. बारामतीची निवडणूक अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली तर दुस-या बाजुने सुप्रिया सुळे व शरद पवार हे सुध्दा बारामतीत तळ ठोकून प्रचाराला लागले आहे. त्यामुळे ही लढाई आता लक्षवेधी ठरली आहे.