मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत इंडिया आघाडीचे नेत्यांची शिवतीर्थावर भव्य सभा झाली. या ठिकाणी मोठी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, यासह देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेतेही उपस्थितीत आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर सुध्दा आहेत.
या सभेत राहुल गांधी यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते माझ्या आईला फोन करून रडत सांगत होते, सोनियाजी माझ्यात त्यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला जेलमध्ये जायचे नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळून भाजपवर टीका केली.
चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल यांनी हा धागा पकडून ‘इंडिया’ आघाडीच्या सभेत चव्हाण यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. राहुल म्हणाले, की अनेकांनी ‘सोशल मीडिया’ हा एक लोकांपर्यंत पोचण्याचा मार्ग आहे; मात्र ‘सोशल मीडिया’ आणि अमेरिकेतील कंपन्यांवर दबाव आहे. आम्ही सर्व विरोधक एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढतो, हे खरे नाही. आम्ही एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. आम्ही मोदी यांच्याविरोधात नव्हे ,तर आम्ही एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत.
राजाचा जीव ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये आहे. राजाचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये आहे. अशी टीका करून ते म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह अन्य नेत्यांना गळा पकडून घाबरवून भाजपत नेण्यात आले, अशी टीका राहुल यांनी केली.