वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
झी मराठीवर वाहिनीवर नवनवीन मालिकांच्या आगमनाचा धुमधडाका सुरूच असून, नुकत्याच शिवा आणि पारू या दोन नवीन सिरीयल सुरू झालेल्या आहेत. आणि आता दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नवरी मिळाले हिटलरला’ आणि ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ह्या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला १८ मार्च पासून येत आहेत.
हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातले हँडसम चेहेरे म्हणजेच अक्षय म्हात्रे आणि राकेश बापट ह्या मालिकां मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर यांच्या बरोबर साथ देणार आहेत अक्षया हिंदाळकर आणि वल्लरी विराज या दोन नवीन नायिका. जुन्या आठवणींसोबत नव्या नात्याची गोष्ट ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मध्ये दाखवली जाणार आहे. दररोज रात्री ९.३० वा. आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ दररोज रात्री १० वा. प्रसारित होतील.