इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांची शिवतीर्थावर भव्य सभा झाली. या ठिकाणी मोठी शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. या समारोप यात्रेला इंडिया आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या सभेत उध्दव ठाकरे यांनी दोन खासदार असणाऱ्या भाजप नावाच्या फुग्यात आम्हीच हवा भरली. त्यांच्या डोक्यात हवा गेली असून हा फुगा फोडण्याची वेळ आली, अशा शब्दांत भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले चारशे पार जागांची स्वप्न पाहायला हे काय फर्निचरचं दुकान आहे का असा प्रश्नही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवताना म्हणाले, की भाजपच्या परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. ज्या संविधानाबद्दल शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, त्याची सुरुवात करा. न्यायालयात एखाद्या स्टेटमेंट द्यायला येतो, तेव्हा धर्मग्रंथावर शपथ घेतो. ते बाजूला करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्या घटनेची शपथ घ्या. हे राज्यघटनेचे महत्त्व आहे. त्यांचेच एक मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटना बदलण्यासाठी चारशेहून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत.
गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितलं होतं, आता लोकशाही मारण्यासाठी टपलेल्या हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी ‘शिवाजी पार्क’ निवडलेलं आहे. शिवतीर्थावरून मुंबईतून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं, तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालू लागतो. आम्ही ‘हुकमशाहीचे‘ विरोधक आहोत असेही ते म्हणाले.
राज्यघटना, संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशेहून अधिक जागा निवडून आणायच्या आहेत. मोदी या व्यक्तीचे माहात्म्य वाढत असून देशापेक्षत ते मोठे होत आहेत. देशापेक्षा कुणीही मोठा नसतो. देश हाच माझा धर्म, देश वाचला तरच आम्ही वाचू, असे ते म्हणाले.