इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – भारतातील नागरिकांकडे काही गोष्टी करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक नोट चलनातून बाद होणार असल्याने ती बदलण्यासाठी फार कमी वेळ उरला आहे. १ ऑक्टोबर त्यामुळेच बऱ्याच अंगांनी महत्त्वाचा दिवस आहे.
दोन हजार रुपयांच्या नोटा चलतनातून बाद होणार आहेत, असे सरकारने आधीच घोषित केले आहे. त्यानंतर लोकांनी बँकांमधून नोटा बदलूनही घेतल्या. पण त्यानंतरही काही लोकांकडे या नोटा शिल्लक असतील तर त्या बदलण्यासाठी त्यांना १ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत. त्यामुळे तुमच्याकडे दोन हजाराची नोट असेल तर ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेतून बदलून घ्या. त्यानंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात वापरता येणार नाही.
ऑक्टोबर महिन्यात बँकांना तब्बल १६ दिवसांची सुट्टी आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन बँकिंग कामांवर होणार आहे. त्यामुळे बँकेसंदर्भात महत्त्वाची कामे असतील तर या चार दिवसातच ती उरकून घ्यावी लागणार आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत पीपीएफ, पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्किम आणि सुकन्या समृध्दी सारख्या योजना आधारकार्डबरोबर लिंक करणे अनिवार्य असेल. अन्यथा त्यानंतर खाते गोठवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकदा खाते गोठवले गेले तर खात्यातून कुठलाही व्यवहार करता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
परदेश दौरा महागणार?
१ ऑक्टोबरपासून परदेश दौरा महाग होणार असून आता ७ लाख रुपयांपर्यंतच्या टूर पॅकेजवर ५ टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे. तर ७ लाखांवरच्या टूर पॅकेजवर २० टक्के टीसीएस भरावा लागणार आहे. याशिवाय सीएजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
These rules will change from October 1.