मुबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत इंडिया आघाडीचे नेते शिवतीर्थावर भव्य सभेसाठी दाखल झाले असून या ठिकाणी मोठी शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. या समारोप यात्रेला इंडिया आघाडीचे बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थितीत आहेत. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनीया गंधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, यासह देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेतेही उपस्थितीत आहे.
भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुंबई दाखल झाली. त्याचे जोरदार स्वागत झाले. आता या यात्रेचा समारोप आज होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरु झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. या यात्रेतून युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय असे पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत.
या सभेत इंडिया आघाडीचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बघा ही सभा लाईव्ह….