इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. त्यात ठाकरे गट सर्वाधिक २२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या आज ठरलेल्या फॉर्म्युल्यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही. परंतु ‘वंचित’साठी चार जागा सोडण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार ठाकरे गटाला २२, काँग्रेसला १६ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला दहा जागा सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.
राहुल गांधी यांच्या सभेआधी मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याचे सांगितले जाते.
या २२ जागा ठाकरे गटाला मिळणार
रत्नागिरी, रायगड, ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, हातकणंगले (पाठिंबा), सांगली, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर, ईशान्य मुंबई.
या १६ जागा काँग्रेसकडे जाणार
काँग्रेसच्या जागाः नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली,रामटेक, अमरावती, अकोला, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर मध्य मुंबई
शरद पवार गटाला या १० जागा मिळणार
शरद पवार गटाच्या जागाः बारामती, शिरूर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा, भिवंडी