इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कल्याण हा कायमच शिवसेनेचा अभेद्य गड राहिला आहे. याच कल्याण शहरात गेल्या काही वर्षात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करून येथील शहरांमध्ये आमूलाग्र बदल केला. याच विकासकामांकडे बघून अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आवर्जून शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यांच्या येण्याने हा शिवसेनेचा गड अधिक भक्कम होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान उपस्थित होते