इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपली जोरदार तयारी करत आहे. त्यात राज्यात महायुती व महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. महायुतीमधील भाजपने ४८ पैकी २० जागा अगोदर जाहीर केल्या आहे. पण, अजूनही २८ जागा जाहीर झाल्या नाही. त्यामुळे भाजपच्या दिल्लीच्या नेतृत्वाने २४ तासा जागाचे वाटप जाहीर करण्याचे सांगितले आहे.
महायुतीचा याअगोदर फॅार्म्युला ठरला आहे. त्यात राज्यातील ४८ जागांपैकी भाजप ३०, शिवसेना शिंदे गट ११ तर अजित पवार गट ७ जागा लढणार असल्याचे ठरल्याचे बोलले जात आहे. दहा जागेवर तिढा होता. पण तो आता सोडून हे जागा वाटप करावे लागणार आहे.
गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा झाल्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर पहिले मुंबईत तर दिल्लीत बैठक झाली. पण, या दोन्ही बैठकीत तिढा सुटला नाही. त्यानंतर आता बरेच दिवस झाले. त्यानंतरही जागा वाटप झाले नाही. त्यामुळे आता दिल्लीच्या नेतृत्वाने याची दखल घेतली असून २४ तासात जागा जाहीर करणार असल्याचे निर्देश दिले आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाने १३ जागांची मागणी केली होती. पण, त्यांना २ जागा कमी देऊन त्यांचे समाधान केले जाणार आहे. राष्ट्रवादीने नऊ जागेची मागणी केली होती. पण, त्यांना ७ जागा दिल्या जाणार आहे. त्यात सातारा, रायगड, परभणी, बारामती, गडचिरोली, धाराशिव व शिरुर हे मतदार संघ सोडले जाणार आहे.