इंडिया दर्पण ऑलाईन डेस्क
महाविकास आघाडीत विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे तर विधान परिषदेचे ठाकरे गटाकडे आहे. पण, आता ठाकरे गटाकडे असणारे हे पद जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे विधानपरिषेमधील नंदुरबार येथील आमदार आमश्या पाडवी हे शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची संख्या आता ७ होणार आहे. त्याचबरोबर तीन आमदारांचा कार्यकाळ जुन आणि जुलैमध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे ही संख्या ४ वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे पद धोक्यात आले आहे.
काँग्रसेची संख्या ८ आहे तर शरद पवार गटाकडे ३ आमदार विधानपरिषदमध्ये आहे. आता जास्त संख्या असल्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाचा दावा करु शकेल. ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहे. त्यात आता हा नवीन धक्का आहे.
लोकसभेच्या निवडणुकी अगोदरच ही बातमी पुढे आली आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर आता दावा केला तर त्याचे परिणाम निवडणुकीवरही होवू शकतो…