प्रशांत चौधरी, नाशिक
-प्रातःकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते ही ऊर्जा तन व मनाला उत्साह व शांती प्रदान करते
-बेडवर बसून उभे राहून किंवा वाकडेतिकडे बसून कधीही भोजन करू नये, शक्यतो जमिनीवर बसून भोजन ग्रहण करणे उत्तम
-भोजन करताना कधीही टीव्ही बघू नये यामधून निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा सर्व ज्ञानेंद्रियांवर नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळे आरोग्य बिघडते
-उत्तम आरोग्यासाठी जेवताना आपले तोंड पूर्व व उत्तर दिशेला करावे शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून जेऊ नये
-घरातील जेवणाच्या टेबलवर कधीही औषधे औषधी चिठ्ठ्या वगैरे कचरा ठेवू नये यामुळे आरोग्यावर परिणाम होतो
-जेवण करण्याच्या आधी भोजन मंत्र म्हटल्यास अन्नातील दोष दूर होतात
-रात्री झोपण्याआधी चहा कॉफी ओला यासारखी उत्तेजकपेय अल्कोहोल घेऊ नये यामुळे अनिद्रा दोषाचा सामना करावा लागतो