इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही. वंचितमुळे या आघाडीची गाडी अडललेली असल्याचे बोलले जात होते. वंचितने १७ जागेची मागणी केली होती. पण, महाविकास आघाडीने चार जागा देण्याचे मान्य केले आहे. त्याचा प्रस्तावही अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठवला आहे. पण, वंचितने तो नाकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एक दोन दिवसात आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची काल रात्री बैठक संपन्न झाली. या बैठकीत शरद पवार हे उपस्थितीत होते. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वंचितनं मविआचा ४ जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. वंचितने थेट १७ जागेची मागणी केली आहे. त्यानंतर आता वंचितला कोणताही नवा प्रस्तावा पाठवायचा नाही. असा निर्णय घेण्यात आला.
असा आहे फॅार्म्युला
महाविकास आघाडीने वंचितला पकडून असा फॅार्म्युला तयार केला आहे. त्यात ठाकरे व काँग्रेस गटाला प्रत्येकी १८ जागा, शरद पवारांना ६ तर वंचितला ४ जागा देण्याचा प्रस्ताव आहे. तर रासप व स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा देण्याची तयारी आहे. वंचित जर बरोबर नसली तर या जागा कोणाल जाणार हे अद्याप निश्चित केलेले नाही.