इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंदापूरः पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्याची घटना शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून आळंदी परिसरात राहत होता.
धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. अचानक दबा धरून बसलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर नंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
धनवे याच्या डोक्यात गोळी लागली. गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नाही. हा गोळीबार पूर्ववैमनसातून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.