इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे -ड्रगमाफिया ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालायात आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र तीन हजार १५० पानी आहे. पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
अमली पदार्थ तस्करीचा मुख्य सूत्रधार ललित अनिल पाटील (वय ३७, रा. नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, सध्या रा. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर), भूषण अनिल पाटील (वय ३४), अभिषेक विलास बलकवडे (वय ३६), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे (वय ३९), जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, सर्व रा. नाशिक), रेहान उर्फ गोल आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), राहुल पंडीत उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (वय ३०, सध्या रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबुराव कांबळे (वय ३२, रा. मंठा, जि. जालना), इम्रान शेख उर्फ अमिर आतिक खान (वय ३०, रा. धारावी. मुंबई), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय २९, रा. वसई, पालघर) या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ललितसह साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपपत्रात शंभरहून जास्त साक्षीदारांची यादी जोडली आहे.