नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पत्रक व्हायरल होत आहे. त्याचबरोबर पेठरोड येथील विभागीय कार्यशाळा येथील कामगारांनी कार्यशाळेच्या गेटवर नुकताच फलक लावण्यात आला असून सहकुटुंब सर्व निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एसटी कर्मचा-यांच्या रखडलेले प्रश्न आणि वेतनवाढ यामुळे एस टी कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ‘आमच तर ठरलं तुमचं काय? तुम्ही पण ठरवा!’ असे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हा निर्णय सर्वच कर्मचा-यांनी घेतला आहे का हे मात्र यात समजत नाही.
एसटी महामंडळाच्या वतीने व्हायरल केले जाणा-या पत्रकावर सर्व महामंडळाला सातवा वेतन आयोग लागू केला मात्र एस महामंडळाचे कर्मचारी त्यापासून वंचित असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या मनात पगार वाढ होत नसल्याची खंत या पत्रकातून व्यक्त केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत होणा-या मतदानात सहकुटुंब सह परिवाराने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत राज्य सरकारच्या या दुटप्पीपणाचा जाहीर निषेध केल्याचे म्हटले आहे.